बुधवार, ८ मार्च, २०१७

"जागतिक महिला दिन"

संध्याकाळी आठची वेळ. इतर मोठ्या शहरांच्या मानाने तशी इथे रात्र लवकरच होते, पण अजून तसा शुकशुकाटही झालेला नाही. तुरळक का होईना माणसं आहेत रस्त्यावर.

ती रात्रीच जेवण हॉटेलात उरकून तिच्या दोन मित्रांसोबत रस्त्याने चालतेय. गप्पा मस्करी सुरु आहे. एक मध्यमीवयीन पण अनोळखी माणूस समोरून त्यांच्याकडे बघत येतो. त्यांच्यापाशी येऊन थांबतो आणि दात-ओठ खाऊन तिला म्हणतो "लाज नाही वाटत? इतक्या रात्री दोन मुलांसोबत रस्त्याने हसत-खिदळत फिरतेयस ?" ती म्हणते "जस्ट फX ऑफ. इट्स नन ऑफ युअर बिजनेस." तो दोघे तिच्याकडे बघत राहतात आणि तो संस्कृतीरक्षक राग गिळून करवादून निघून जातो.

भारताच्या सर्वाधिक साक्षरता आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर असलेल्या राज्यात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा