मंगळवार, २२ मार्च, २०१६

ऐसा भी होता है part 3

कधी कधी रोजच्या जगण्यात काही प्रसंग घडतात. फार साधे असतात ते, त्यात काही वेगळं असेलच असंही नाही पण असे अनुभव थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाला येतात.. असे रोजचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न म्हणजे "ऐसा भी होता है.." ही ब्लॉग मालिका. त्या माळेतला तिसरा मणी..

-----------------------------------/-/---------------------------

या वेळी मी मुंबईच्या आंतर-राष्ट्रीय विमानतळाबाहेर पडलो. लोकलच्या स्टेशनला जायला म्हणून रिक्षा करायला लागणार होती. मीटर रिक्षाच्या रांगेत 15 - 20 मिनिटं उभं राहिल्यावर नंबर आला. त्या रिक्षावाल्याने सुरु करता करताच शेजारच्या सुशोभित द्विभाजका (devider) वर पचकन थुंकला.. त्याक्षणी मी स्वतः ला आवरलं. पण एक पाचेक मिनिटांनी मी त्याला म्हटलं "भैया मोदीजी क्या कहते है सुना है आपने? आप अभी वहां ऐसे थुंककर गंदगी कर आये.."

"मोदीजी तो कहते ही रहते है.." म्हणत त्याने सारवा सारव करायचा प्रयत्न केला..

तरी मी मुद्दा लावून धरला, "गलत तो नही कहते? हमारी भी कोई जिम्मेदारी है या नहीं? इसी एअरपोर्टपर जब बाहरसे लोग आयेंगे, तो आपकी ये पुताई देखकर क्या कहेंगे? पुढे मला तो खजील झाल्यासारखा वाटला.

एका दोन मिनिटाच्या शांततेनंतर खूप उदार होऊन मला म्हणाला "भैया... हमने जो है मीटर नही डाला है.. तो आप समझकर दो-तिनसौ दे देना।"

आता मी त्याला चांगलंच फैलावर घेतलं.. "क्यों नहीं डाला? आपकी गलती है। तीन किलोमीटर के रास्ते केलीये तीनसौ रुपये?"

मग म्हणे आम्हाला तिथे पार्किंगचे पैसे द्यायला लागतात. तिथे लाइनीत उभं राहावं लागतं वगैरे वगैरे..

म्हट्लं "वो सब आप मुझे मत बताओ. ये काम है आपका। क्या हम हमारे काम की दिक्कते बोल सकते है हमारे बॉस को? वो हमे उसी बात की तनखाँ देता है। मैं मीटरसे जाने के लिये उस लाईनमें तकरिबन बीस पच्चीस मिनट खडा था.. (रांगेत माझ्या पुढचा माणूस कंटाळून निघून गेलेला. रिक्षाच्या बाहेर तो माणूस दाखवत ) ये आदमी देखो, मेरे आगे खडा था लाइनमें। तंग आकार पैदल निकला है, देखो कहातक पहुँचा।"

मग तो मवाळकीच्या सुरात म्हणे, "सर, कहाँ हजार पांचसौ मांग रहा हूँ।"

म्हटलं "भैया, मजाक अच्छा कर लेते हो आप। आप मांग भी नही सकते उतना, इतनीसी दुरी के लिये। अब मैं जो ठीक समझू, दे दुंगा।"

मुंबईत बाहेरून येणाऱ्या लोकांचं स्वागत हे अशा पद्धतीनं होतं. एरव्ही मुंबईत कुठेही निमूटपणे मीटरने जाणारे रिक्षावाले रेल्वे स्टेशन आणि एअर पोर्ट च्या बाहेर असं सावज शोधत असतात...

1 टिप्पणी: