सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

स्थलांतर...


एखाद्या मातीत तग धरून उगवलेलं रोपटं
उपटून दुसरीकडे अज्ञात मातीत रुजवण्याचा सोहळा
त्या रोपट्यासाठी अजिबात सोपा नसतो.. पुनर्जीवन असतं..
कुठूनतरी एखादी चिंधी कापून
नवीन जागी शिवून ठिगळ लावण्यासारखं..
मग एकेक टाका घालत जातो काळ,
मागचे उसवलेले आणि उघडे पडलेले काठ
ठसठसत राहतात नवीन जागी रुळण्याआधी..
हळूहळू त्यांचं उसवत राहणं म्हणजे सोपस्कार असतो प्राणघातक...
मागच्या कापडाशी मिळते जुळते केलेले धागे,
नव्या ठिकाणी उपरे होऊन डोळ्यात भरतात.. अस्वस्थ करतात..
काळाच्या त्या टाक्याची वाट बघत असतात
जो त्यांना नवीन जागी बेमालूमपणे शिवून टाकेल.. एकरूप करेल..
-विनायक

(बंगलोरहून त्रिवेंद्रमला येऊन आपटल्यावर आलेला स्वानुभव...)

२ टिप्पण्या: