सोमवार, ४ मे, २०१५

समुद्र

समुद्र म्हणत असतो गाणं...
कधी आपल्याच लाटांच्या संथ लयीत
एखाद्या धीरगंभीर शास्त्रीय गायकासारखा विलंबित खयाल मांडलेला..
कधी उधाणलेल्या लाटांवर उडत्या चालीचं भावसंगीत गात बसलेला...
कधी ऐकत रहावं त्याचं गाणं.... तासनतास
त्याच्या लाटांची गाज कानातून थेट हृदयाला जाऊन भिडते..
इतका सच्चा सूर..
दोघेही हरवून जातात मग आपल्याच तंद्रीत...
लाटांचे सूर खेळवणारा पंडित समुद्र नामक गायक..
आणि आठवणीत रमणारा किनाऱ्यावरचा श्रोता..
जाणीवेच्या पलीकडे नेऊन सोडणारी मैफल रंगते..
-विनायक
1 टिप्पणी: