बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

सरत्या वर्षाच्या अनेक हार्दीक शुभेच्छा!!

चहा संपता-संपता कपाचा जस-जसा तळ दिसू लागतो आणि उरलेली साखर विरघळत चहा अजूनच गोड-गोड होत जातो... 
सरतं वर्षं तसंच उत्तरोत्तर रंगत गेलं.. वाईट गोष्टी घडल्याही असतील काही, पण चांगल्या गोष्टींच्या सूर्यप्रकाशात त्यांचा अंध:कार नजरेआड झालाय... 
यावर्षी आमच्या घरी आलेला नवीन पाहुणा (माझ्या बहिणीचं नवं बाळ), माझी अमेरिका वारी, तिथलं अवार्ड आणि डिग्री व्यतिरिक्त आणखी पण बऱ्याच छोट्या-मोठ्या चांगल्या घटना घडल्या... मित्रांसोबतच्या दोन लग्नासाठी केलेल्या दोन सहली... काही मित्रमंडळींची बऱ्याच वर्षानंतर पुन्हा भेट.. काही नवे मित्र, काही नवी पुस्तकं, काही नवे आदर्श... यादी न संपणारी आहे...
पुढचं वर्ष आपल्या गाठोड्यातून काय उघडतंय याची उत्सुकता आहे...
तुमचंही हे वर्ष मजेत गेलं असेल अशी आशा करतो... सरत्या वर्षाच्या अनेक हार्दीक शुभेच्छा!!
-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा