शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

राजकारण..

मतांचं आणि मतपेट्यांचं राजकारण
जातीचं आणि धर्मवेड्यांचं राजकारण
आरक्षणाचं आणि आरक्षितांचं राजकारण
नीतीमत्ता ढासळलेलं आजचं राजकारण...

पाण्याचं आणि अन्न-धान्याचं राजकारण
शेतीचं आणि शेतकरी आत्महत्यांचं राजकारण
पैशाचं आणि पैसेवाल्यांचं राजकारण
संवेदना हरवलेलं मुर्दाडांचं राजकारण

घरं आणि बिल्डरांचं राजकारण
गुंड आणि गुन्हेगारांचं राजकारण
रंग आणि झेंड्यां-झेंड्यांचं राजकारण
जाड कातडीच्या गेंड्यांचं राजकारण

नोकऱ्या आणि नोकरदारांचं राजकारण
भ्रष्टाचार आणि भ्रष्ट सरकारांचं राजकारण
वस्तू आणि त्यांच्या वितरणांचं राजकारण
सामान्यांच्या भावनांशी प्रतारणांचं राजकारण

बातम्या आणि बातमीदारांचं राजकारण
सोशल मिडिया आणि टीकाकारांचं राजकारण
चर्चा आणि महाचर्चांचं राजकारण
माणुसकीच्या जमा-खर्चाचं राजकारण

घटनेच्या प्रत्येक कलमाचं राजकारण
संसदेच्या प्रत्येक चलनाचं राजकारण
देशाच्या नसानसात भिनलेलं राजकारण
लोकशाहीचा गळा घोटून उरलेलं राजकारण

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा