सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

निरोप

आता सरला संचय। दिसा-दिसाची ती सय।
ठेवोनी जाती अमेय। स्वगृही।।

त्याची लागे मना ओढ। उभे थांबूनिया थोडं।
दिस शेवटचा गोड। होउदेत।।

असा राहूदेरे लळा। तुझ्या प्रेमाचा सोहळा।
तुझ्या दातृत्वाच्या कळा। असुदेत।।

तुला देतो हा निरोप। लागे अंतरात खूप।
तुझे पाठमोरे रूप। साहवेना।।

तुझ्या चरणाच्या पाशी। दूजी जागा नसे खासी।
पुन्हा भेटावे आम्हासी। येवोनिया।।

-विनायक कांबळे

गणपती बाप्पा मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा