शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

गर्दी..

मुंबई मध्ये काम नसलेल्या लोकांची खूप अडचण होते. म्हणजे "त्यांची" काहीच अडचण नसते...तर लोकांना "त्यांची" अडचण होते. "ए भाय.. किधरको जानेका नाही तो खाली पिली कायको रस्तेमे खडा होके जागा अडाके रखताय ...?" आणि एक जळजळीत कटाक्ष.. X-)
त्या दिवशी रस्त्याने चालताना हाच अनुभव आला. कोणे एके काळी मी सुद्धा याच गर्दीतून असाच धावताना दिसत असेन. वारुळातून बाहेर पडणार्या मुंग्या असतात ना तशीच ही गर्दी-
एखाद्या त्रयस्थ माणसाला बघून वाटावं की ही माणसं त्या मुंग्याप्रमाणे दिशा भरकटली आहे आणि देव जाणे कुठे जात आहेत? कारण त्यांचं त्यांना माहित असेल असं त्यांच्याकडे बघून तरी वाटत नाही..
जेव्हा आपण त्या गर्दीचा एक भाग असतो, तेव्हा ती गर्दी अशी जाणवतच नाही. गर्दीची जाणीव व्हायला त्या गर्दीतून बाहेर येऊन ति-हाइताप्रमाणे तिच्याकडे बघायला लागतं. मुंबईच्या गर्दीचं असंच काही.... आणि बहुतांशी आयुष्याचं सुद्धा. तुमच्या भूमिकेतून बाहेर येऊन तुमच्या भूमिकेकडे पहा. कदाचित नवीन वेगळे मार्ग सापडतील..जगण्याचे आणि आयुष्याकडे बघण्याचे.

आज मी या गर्दीचा भाग नसलो तरी ही गर्दी काही मला परकी नाही. ह्याच platform वर, रस्त्यांवरून, ट्रेन मधून माझं रोजचं येणं जाण होतं. माझं घर, कुटुंब आणि माझ्या शाळा-कॉलेजा इतकीच ती मला परिचयाची आहे. फक्त माझा परिचय तिच्या डोक्यातून पुसट झाला आहे इतकंच..

vinayak kamble

२ टिप्पण्या: