सोमवार, ९ जून, २०१४

स्वत्व...

म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही
स्वत: बद्दल सांगण्यासारखं असतं प्रत्येकाकडे काही

ज्याचा त्याचा रंग आहे, ज्याची त्याची शाई
प्रत्येकाचे चित्र वेगळे, वेगवेगळी रंगाई

क्षणात येते ओठी हासू, त्या हसण्याच्या कितिक तऱ्हा
टचकन येता डोळा पाणी, सगळ्यांचा सारखा चेहरा

ह्याच्या शब्दामध्ये जादू, त्याचा गाता गोड गळा
नृत्य ,क्रीडा अन् अभिनय, शिल्प ना-ना रुपी ना-ना कळा

शोध जरा तू स्वत:मध्ये, तुला सापडे वाट नवी
तुझ्यामध्येही दडले काही, तुलाच त्याची जाण हवी

परमेश्वराने तुजला दिधले तुझ्याच पदरी दान खरे
तुझ्यावीण तो दूजा न कोणी सत्पात्री दाना उतरे

विनायक कांबळे२ टिप्पण्या:

  1. Meghana: I was missing your encouraging comments since long time...
    ही कविता मराठी मंडळाच्या निरोप समारंभाकरता लिहिली होती. आपल्या(IISc च्या) मराठी मंडळात (एरव्ही सुद्धा) लोकांच्या मर्यादित सहभागाचं एक कारण म्हणजे लोकांचे स्वत: विषयीचे न्यूनगंड. काहीतरी कला, हुनर प्रत्येकामध्ये असतो पण एक स्वतःच निर्माण केलेलं मर्यादेचं कवच आपल्याला ती कला जाहीर करण्यापासून रोखून धरत असतं. मंडळाने (खरंतर शंतनूने Shantanu Bhat) माझ्यातला लेखक / कवी हेरला आणि प्रोत्साहन दिलं. त्याकरता मी त्यांचा कायम आभारी राहीन. असे माझ्यासारखे कितीतरी लोक एक न्यूनगंड मनात बाळगून जगत असतात त्यांच्यासाठी आहे ही कविता. स्वत:च्या न्युनगंडावर मात करण्यासाठी दिलेली हाक... यातनं एखाद्याला जरी त्याचं स्वत्व सापडलं तरी ही कविता सार्थकी लागली असं मी म्हणेन...

    उत्तर द्याहटवा