सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

उध्वस्त...

उध्वस्त झाल्या घराचा पाया टिकून आहे
हताश तो निवासी तेथे बसून आहे..

बघतो पुन्हा न्हाळून, तो घाव प्राक्तनाचा..
आधार वाटे ज्याचा तेच कोसळून आहे

जेथे धरावा माथा, भिंती न राहिल्या त्या..
ज्याच्या मध्ये निजावे घरटे न तेच राहे...

ती रात्र होती वेडी, घेऊन सर्व गेली...
ओंजळीत माझ्या धुरळा पडून आहे...

मी पाहतो तुझ्यारे लीला कितीक नशीबा...
दुसऱ्या कोणास देऊ हा दोष मी कसा रे ?

डोळ्यात साचलेले धरतो तिथेच पाणी..
हृदयात भावनांचा बांध तो फुटून आहे...

-विनायक कांबळे
Cyclone Nargis , Burma, 2008 /
Image Courtesy  http://vervephoto.wordpress.com/2008/08/08/brian-sokol/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा