रविवार, २४ मार्च, २०१३

अरबांच्या देशात... भाग १


त्या दिवशी रजिस्टरवर सही करायला जाऊन, शेजारीच ठेवलेल्या ट्रेमध्ये एक पोस्टर सापडलं. ते आमच्या लॅबमधल्या एका (सोडून गेलेल्या ) सिनियरच्या नावाने आलं होतं. मी ते घेऊन आलो. ते यु. ए. ई. मध्ये होणार्‍या एका कॉनफ़रन्स बद्दल ते पोस्टर होतं. वाचून थोडी गम्मत वाटली, कि यु. ए. ई. त कुठुन आलंय रिसर्च आणि कॉनफ़रन्स?? अरबांच्या डोक्यावर पांढरं कापड अंथरून ठेवलेल्या काळ्या (कुकरच्या रिंग सारख्या दिसणाऱ्या ) रिंग खाली बुद्धी असेल याबद्दलच मुळात आम्हाला शंका!! गडगंज संपत्तीत लोळणाऱ्यांना हे उद्योग का सुचावेत? मी आणि माझ्या labmate ने ही गोष्ट वाचून जाम गंमत केली आणि ते पोस्टर बाजूला ठेवून कामाला लागलो. असो.

सहज म्हणून पुन्हा एकदा ते पोस्टर टेबलावर ठेवलेलं दिसलं आणि नीट वाचू लागलो.त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं "Under the patronage of His highness Sir Saud al Kasimi.." वगैरे वगैरे...आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा शेख नुसताच आशीर्वाद देत नसून, या कार्यक्रमाला येणाऱ्या सगळ्या students participants ना येण्या जाण्याचा खर्च (travel grant) सुद्धा देत होता. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. म्हटलं काय हरकत आहे, टाकूयात abstract. जास्तीत जास्त काय होईल. रिजेक्ट होईल इतकंच. आणि पैसे मिळाले तर जायचं (आणि कदचित तरंच जायचं.) online दुबईच्या तिकीटाची किंमत पाहिली. वीसेक हजारात काम भागणार होतं (फक्त तिकीटाचे). तशी २० हजार फार मोठी रक्कम नव्हती. म्हणून म्हटलं घेवूया चान्स. सरळ abstract लिहिला आणि पाठवून दिला, सरांना न विचारताच. एक्सेप्ट झाल्यावर सांगावच लागणार होतं. आणि खरंतर शेवटची तारीख सुद्धा निघून गेली होती. तरी मेल पाठवला.

बरेच दिवस वाट पहिली उत्तराची. जानेवारी उजाडला. "Accepted abstract will be notified by email in January" असं वेबसाईट वर लिहिलं होतं. माझ्या मनात हुरहूर होतीच. पण जानेवारीचा पहिला आठवडा जाऊन, दुसरा सुद्धा संपत आला होता.

आणि एक दिवशी तो acceptance आला. "Your absract has been accepted for poster presentation at International Workshop on Advanced Materials (IWAM) 2013. to be held in Ras al Khaimah U.A.E. during 24-27 February 2013." वगैरे वगैरे…
एक प्रकारे आनंद तर होताच, पण मोठा प्रश्न हा होता कि, "आता पुढे काय"?..

५ टिप्पण्या:

 1. Arey interesting!!! Pudhcha wachayla utkantha jagrut zaliye. Evdha chhotasa ka lihilas pahila bhag?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अरे हे लिहायला खूप मोठी energy barrier क्रॉस करून सुरुवात केली.
   इतके दिवस आजचं मरण उद्यावर ढकलत होतो. म्हणून थोडसं लिहून सुरुवात केली. पण सांगण्यासारखं या प्रवासात (आणि त्याच्या आधीसुद्धा ) खूप काही घडलं. आणि (तुमच्यासारख्या)लोकांचे appreciation मला पुढे लिहायला बळ देईल म्हणून थोड्याशाच भागाने सुरुवात केली. बघुयात कुठवर नेता येतं ते...

   हटवा
 2. Hey tar tv serial pahayla basla aani climax yenar itkyat 'break' announce vhava tasa jhala aso....aata curiosity vadhli aahe....waiting for break ke baad....

  उत्तर द्याहटवा