बुधवार, ३० जानेवारी, २०१३

साधी सोपी कविता

साधे सोपे शब्द सहजच लागतात जुळू..
साधी सोपी कविता आपोआप लागते कळू..

साध्या साध्या शब्दातून विचार होतो जरा..
वाचता वाचता शब्द दिसतो प्रकाशा इतका खरा..
जसा काळ्याकुट्ट पाषाणातून उन्मळावा स्वच्छ, नितळ झरा..
तसंच काही सांगून जाते कविता हळू-हळू
साधी सोपी कविता मग आपोआप लागते कळू..

यमक हवंच असंही नाही..
वृत्त-छंद जमतील काही..
अलंकाराविना देखणी, तिच्या रुपाला दुनिया पाही..
वाचत जाता थिरकत जाते.. ठेका होतो सुरु...
साधी सोपी कविता मग आपोआप लागते कळू...

-विनायक..

२ टिप्पण्या:

  1. arey khup masta! sadhya sahbdatli kavita, mala vrutta chhand vagare kalat nahi far, pan hya kavitela ek theka ahe! i think, mukta chhand kavita jari asli tari tila theka asel tar ti ankhin chhan watte. :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. इथे कॉमेंटला लाईक करण्याची सोय नाही. नाहीतर मी ते करून तुझे आभार मानले असते. खरंतर ही कविता एका (पांचट) चर्चेतून जन्माला आली आहे. कविता कशी असावी अशी काहीतरी चर्चा गरीबांमध्ये चालू होती. मग हे बाहेर आलं. आणि वृत्त छंदांचा म्हणशील तर मला पण ते शेअर बाजाराइतकंच कळतं...

      हटवा