गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

काळाच्या पाऊलखुणामूळ कविता :

Tracks on the sands of Time


Tracks long lost in time
Those brought to the verge of decline

Evidence of our transition from fours to twos
Time freezes on the faces of the moon

Tracks often meet on the journey called life
Though they will someday be washed away
May they lead us to the source loving and bright

-Ashish Joglekar


अनुवाद :

काळाच्या पाऊलखुणा

अनादी अनंत काळामधल्या लुप्त होणाऱ्या पाऊलखुणा
नियतीने नाकारलेल्या जीवनाच्या खिन्न व्रणा...
सलाम माझा मानून घ्यावा, सृष्टीमधल्या नवसृजना.. ||धृ||

अनंतामध्ये विरून गेल्या उत्क्रांतीचे दुवे म्हणा ..
युगायुगांतून दबून गेल्या असंख्य-अगणित संक्रमणा
काळालाही गोठवणाऱ्या इतिहासाच्या दिव्य क्षणा.
चंद्राच्याही भाळावर उठणाऱ्या दिग्विजयी पदचिन्हा
सलाम माझा मानून घ्यावा, सृष्टीमधल्या नवसृजना.. ||१||

दिसणाऱ्या पाऊलखुणा.. न दिसणाऱ्या पाऊलखुणा..
योग-वियोगांशी खेळत जन्म-मृत्यूचे चक्र पुन्हा
काळपटाच्या वाळूवरच्या क्षुद्र अशा कणा कणा...
काळाच्या एका लाटेसंगे वाहून जाण्याचा अभिशाप तुम्हा...
वाट दाखवी प्रकाशाची, दिगंताच्या अंतर्मना
सलाम माझा मानून घ्यावा, सृष्टीमधल्या नवसृजना..||२||

-विनायक कांबळे


मी इथे माझा मित्र आणि मूळ इंग्रजी कवितेचा कवी आशिष जोगळेकर याचे आभार मानू इच्छितो, हि कविता आणि मुळात हि संकल्पना दिल्याबद्दल धन्यवाद आशिष..

१० टिप्पण्या:

 1. Mul kavita mastach ahe.. ani marathi rupantar pan masta jamlay. Kavitecha artha nemka mandne, te pan navya kavitecha laheja, yamak vagaire sagle sambhalun - hek kharach awghad kaam ahe. Best re!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद शंतनु..
   मुळात इंग्रजी कविता वाचता वाचताच हे शब्द सुचत होते पण आधी सुचलेल्या वाक्याची रचना थोडीशी वेगळी होती..
   आणि मग शेवटच्या कडव्याला हि रचना(छंद)आली मग मी आधीची २ कडवी आणि धृवपद सुद्धा याच छंदात फिरवलं..

   ती मुळची कविता हि अशी...


   अनादी अनंत काळामधल्या लुप्त पाऊलखुणांनो..
   नियतीने नाकारलेल्या जीवनाच्या व्रणांनो...
   सलाम माझा मानून घ्यावा, नवसृजनाच्या वीरांनो.. ||धृ||

   अनंतामध्ये विरून गेल्या उत्क्रांतीच्या दुव्यांनो...
   युगायुगांतून दबून गेल्या संक्रमणाच्या पळांनो..
   काळालाही गोठवणाऱ्या इतिहासाच्या क्षणांनो..
   चंद्राच्याही भाळावर उठणाऱ्या विक्रमी पदचिन्हांनो..
   सलाम माझा मानून घ्यावा, नवसृजनाच्या वीरांनो.. ||धृ||

   दिसणाऱ्या पाऊलखुणा..
   न दिसणाऱ्या पाऊलखुणा..
   योग-वियोगांशी खेळत जन्म-मृत्यूचे चक्र पुन्हा
   काळपटाच्या वाळूवरच्या क्षुद्र अशा कणा कणा...
   काळाच्या एका लाटेसंगे वाहून जाण्याचा अभिशाप तुम्हा...
   तरीही अनंताच्या प्रवासातल्या निस्वार्थ सहचरांनो
   सलाम माझा मानून घ्यावा, नवसृजनाच्या वीरांनो.. ||धृ||

   हटवा
  2. Sorry चुकून प्रत्येक कडव्याच्या शेवटी ते ||धृ || असाच राहिलंय...
   Copy + paste चा परिणाम हा हा हा !!...

   हटवा
  3. hahaha. chalaychach! he wachun mi lahanpani shiklela ek prabodhan geet athavla -

   Giri-kuharatil gard banatil sinhachya chhavyanno
   timir-puratil krishna-ghanaatil tejaswi taryanno
   pralayankar shaktichi tumchya aaj prachiti dya
   tumchya shubhakar samarthyachi aaj prachiti dya

   mook mananchya karagari dhumsat hi chingari
   weej houni kosaLu dya ti uddhat andhaari
   ...

   pudhcha athvat nahiye ata :(

   shabdartha - Kuhar = guhaa
   shivay uddhat madhla t cha uchchar tarbujatla t nahi, tawa sabji madhla t ahe :)

   हटवा
  4. ha ha ha..

   tava sabji kay?? anyways me te uddhaT asach vachla hota adhi. sangitlas te bara zala..

   pan hi kavita vachtana ek gammat suchli..
   vidamban nahi mhannar par tyach chalivar he vachun bagh...

   गल्ली-बोळातील, नाक्या-नाक्यातील सडकछाप छाव्यांनो..
   या शहरातील, त्या शहरातील गुंडगिरीतल्या ताऱ्यानो..
   pudhacha nantar purn karun tula aikvin... ha ha .. :-)

   हटवा
 2. छान जमली आहे. मूळ कविताही खूप सुरेख आहे. आवडली!

  उत्तर द्याहटवा
 3. mook manachya karagari dhumasat ji chingari
  vij houni kosaludya ti uddhat andhari
  tra bhamatun yeila baharun hirava swarg udhya
  tumbhya shubhakar samrthyachi aaj prachiti dya

  pavitra moorty priya aaichi dubhang pari zali
  amit sampada atul vaibhave kutilani lutali
  gatkalache vishal gaurav bhavishya ghadauya
  tumbhya shubhakar samrthyachi aaj prachiti dya

  Mala pudhachi kavita aathavat nahi konala mahit asel tar please poorna kara.

  उत्तर द्याहटवा