सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

"सोप्या" शब्दात एखादी गोष्ट सांगणं खूप "कठीण" असतं..रुजुवात : प्रतिभा संक्रमण


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=232738:2012-06-15-17-25-26&catid=401:2012-01-20-09-48-58&Itemid=405
या लेखावरुन सुचलेलं... किंबहुना या लेखानी माझ्यात संक्रमित केलेलं ..

"सोप्या" शब्दात एखादी गोष्ट सांगणं खूप "कठीण" असतं..
"जे सुचलेलं असतं किवा एखादी गोष्ट पाहून-वाचून जे उमगलेलं असतं ते नेमकेपणानं सांगता येणं, याला प्रतिभा म्हणतात. मग माध्यम काहीही असो. लेख, कविता, चित्र वा शिल्प किवा तत्सम काहीही, जे आपल्या विचारांना समर्पक रूप देईल.

मी मागे एकदा माझ्या फेसबुक वरचा एक पोस्टमध्ये म्हटलं होतं, "कला हि कलाकाराच्या मनाचा आरसा असते. आणि पाहणारा जेव्हा त्या आरशात स्वत;च्या मनाचं प्रतिबिंब पाहतो, तेव्हा त्या रसिकाकडून खरी दाद आपोआप येते."तसंच काही म्हटलंय या लेखात. आणखी एक गोष्ट जी relate करू शकलो (यालाच अनुभूती म्हणतात ) ती म्हणजे लिहू म्हणून लिहायला बसल्यावर हातून काही नवीन लिहिणं होईलच असं नाही. (लिहिणंच नाही हा नियम प्रत्येक नवनिर्मिती ला लागू होतो.). त्या करता एक नवीन विचार लागतो आणि तो विचार व्यक्त करण्याची आपल्या अंगी प्रतिभा लागते. (पुन्हा त्याच माध्यम काहीही असू शकतं. )

पुढे लेखकच असं मत आहे (आणि काही अंशी मी हि त्याच्याशी सहमत आहे ) कि प्रत्येक कलाकृती हि तिचं भाग्य सोबत घेऊन जन्मते. बऱ्याचदा एखादी निर्मिती केल्यानंतर आपल्याला असं वाटतं कि "हे काही नवीन नाही..." आणि आपण ती नष्ट करतो. पण त्याच्यातलं नाविन्य तोपर्यंत आपल्याला उमजत नाही जो पर्यंत ती निर्मिती अशा रसिका पर्यंत पोहोचत नाही कि ज्याला ती अनुभूती आलेली असते. (रसिकाला कलेच्या आरशात मनाचं प्रतिबिंब दिसणं ते हेच.) मग अशा निर्मितीला त्या रसिका पर्यंत पोहोचण्याची संधी हवी असते.

आणि मग अशा कलाकृती पुढे प्रकाशित झाल्यावर त्या इतरांना प्रेरणा देतात त्यातून नवीन काही सुचवून. जे कदाचित आधीच्या निर्मात्यांन अनुभवल नसेल किवा ते त्याला व्यक्त करता आलं नसेल. यालाच लेखकाने प्रतिभेच संक्रमण असं म्हटलंय. पण सगळ्याच कलाकृतींना हि संक्रमणाची (नवनिर्मितीला प्रेरक ठरण्याची) ताकद असेलच असं नाही. अशा असफल कलाकृती काळाच्या ओघात नष्ट होतात आणि फक्त नवसंक्रमणक्षम कलाकृती तग धरून राहतात आणि जोपासल्या जातात, कायम. ज्या जोपासल्या जातात त्यांना नवोन्मेषाचं वरदान लाभतं, तर ज्या नष्ट होतात त्यांना अंधारात लुप्त होण्याचा शाप.!!!"

२ टिप्पण्या:

 1. अशा असफल कलाकृती काळाच्या ओघात नष्ट होतात आणि फक्त नवसंक्रमणक्षम कलाकृती तग धरून राहतात आणि जोपासल्या जातात, कायम. ज्या जोपासल्या जातात त्यांना नवोन्मेषाचं वरदान लाभतं, तर ज्या नष्ट होतात त्यांना अंधारात लुप्त होण्याचा शाप.!!!"
  Rightly expressed...but I feel commercially baryachda kahi kalakruti competent asunahi baryach lokanparyant 'kadhich' pohachu shakat nahi....I feel its all a matter of 'nashib'and the 'fame' game that declares an art 'asafal'....but yet even if it makes a difference in one person's life...then that is the greatest reward for the artist.....more than any mass appreciation...

  Anyways...I happened to go through the profile and blog of your friend(meghana) somehow....must say one of the most beautiful blogs I visited...rich in content....and via her profile happened to visit another blog named 'Kaleidoscope of dreams'by someone named mukta....what a writer this woman is!!!

  उत्तर द्याहटवा
 2. Harshada:Thanx and U said it right.. sumtimes its just luck dat decides things...

  And Meghana is also a good freind of mine, and even I feel her way writing is really different. I'm also afan of her blog.. :)
  And I shall convey ur appreciation to her..

  उत्तर द्याहटवा