मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

स्वातंत्र्य दिन... ??

ट्राफिक सिग्नल वर थांबलेल्या गाडीच्या काचेतून एक चेहरा डोकावतो..
हातातले झेंडे पुढे करत "एक झेंडा घ्या साहेब" विनवतो...
गलिच्छ त्याच्या अवताराकडे साहेब खाल - वर न्याहाळतो..
देशाशी सोयरसुतक नसतं...
पण समाजसेवेचा आव आणत साहेब एक झेंडा विकत घेतो..
२ रुपयाची कमाई झाली.. गरीब खुश होतो...
२ रुपयांनी देशसेवा केली असं साहेबही समजतो..
आम्ही आपल्या स्वातंत्र्य दिनाची ही अशीही दशा पहातो..

पेपरमध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट, दुष्काळ, दंगली या साऱ्या बातम्या सोडून..
सेन्सेक्स च्या वाढलेल्या दशांशाकडे वळतो..
आज गुजरात, उद्या असाम, असा आडवा-ऊभा भारत जळतो..
प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार, प्रत्येक जण लाचार इथे अनंत दु:खाने कळवळतो...
आम्ही आपल्या स्वातंत्र्य दिनाची ही अशीही दशा पहातो..

देश जाहला स्वतंत्र त्याच्या स्वातंत्र्याची लक्तरे पहातो...
अंधारात या सभोवतीच्या.. देशाचा या श्वास कोंडतो...
रात्र अशी मग सरतच नाही.... अंधार असा हा गडदच होतो...
अनंत मग आशावादी होऊन आम्ही रात्री पलीकडचा सूर्य पहातो..
आम्ही आपल्या स्वातंत्र्य दिनाची ही अशीही दशा पहातो..

-विनायक कांबळे

२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. Face book वर एक चित्र बघून सुचलं..
      पण ते फक्त निम्मित होतं कदाचित.. हे विचार असे डोक्यात फिरतच होते कधीपासून.....

      हटवा