मंगळवार, १ मे, २०१२

मुंबई कोणाची??

 मुंबई कोणाची??
जे मुंबईला आई म्हणून जगतात...
जे मुंबईच्या रस्त्यावर संसार थाटतात ..
जे मुंबई मिळवून देईल ते खातात..
जे मुंबईची फुटपाथ पांघरून झोपतात..

जे मराठी-गुजराथी शब्द घुसवून हिंदी बोलतात...
जे वडापावला वैश्विक दर्जा देतात..
जे रस्त्यावरच्या चाट-पावभाजी-बुर्जीपाव ला गोड मानून घेतात..
आणि तितक्याच आवडीने हॉटेल दिल्ली दरबार मध्ये जेवतात..

दहीहंडीला रस्त्यावरती जमतात..
mount मेरीच्या जत्रेला जोडीने बांद्रा band -stand गाठतात..
रमजान काळात भेंडी बाजार फिरतात..
महालक्ष्मीला गेल्यावर, हाजी अली न चुकता करतात...

जे रविवारी गल्ली-गल्लीतून क्रिकेट खेळतात..
चिडून एकमेकांविरुद्ध राडे करतात..
इंडिया-पाकिस्तान match साठी दांडीमारून वानखेडे गाठतात...
इंडिया हरली तर घरी बायको वर राग काढतात..

जे कॉलेजच्या कट्ट्यावरून थेट चौपाटी गाठतात..
वरळी सी फेस, छोटा काश्मीर, नाहीतर national पार्क ला वरचेवर जातात.. 
एखादा दिवस group करून अर्नाळा बीच किवां अलिबागला जातात..
शनिवार रात्री शेवटची ट्रेन पकडून झेनिथ खाली भिजायला खोपोली गाठतात..

जे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पायी चालत जातात..
जे गणेशोत्सवाची डोळ्यात प्राण आणून वाट बघतात...
लालबागच्या राजाचा नवस फेडायला दोन-दोन दिवस रांगेत थांबतात..
आणि ते, जे अशा रांगेतल्या लोकांना पाण्याचा ग्लास पुढे करतात..

जे मुंबईतल्या उंच इमारतिंइतकीच  उंच स्वप्न बघतात..
जे ना skyscraperch कौतुक, ना झोपडपट्टीची कीव करतात..
जे आयुष्यभर कष्ट करून स्वतः पुरतं एक घरटं बनवतात..
ज्याच्या ओढीने संध्याकाळी परतताना माणसाचा महासागर ओलांडतात...

दादर चा ब्रिज चढण्याआधी "कैलास लस्सी" आणि " श्री कृष्णा" चा वडा खातात..
जे दादरचा गच्च भरलेल्या plaform बघून "आज गर्दी जरा कमीच आहे.." म्हणतात...
अंधेरीला चढणाऱ्या जोडीदारासाठी दरवाजावर जागा ठेवतात..
लग्न-बारशाची कार्ड वाटताना ट्रेन मध्य ग्रुपसाठी काही कार्ड राखून ठेवतात..

जे पावसाने तुंबलेल्या मुंबईत पायी चालत घर गाठतात..
जे सतत दहशतीच्या टांगत्या तलवारीखाली जगतात.
बॉम्बस्फोटात गेलेल्या लोकांसाठी टीवीवर बातम्या बघून हळहळतात..
दुसर्या दिवशी पुन्हा येऊन नेहमीच्या ट्रेन ची वाट बघतात...

विनायक कांबळे..


२ टिप्पण्या:

 1. chhan lihilay.....'mansacha mahasagar olandana' hi phrase khup creative aahe.....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Thanks हर्षदा..

   "जे आयुष्यभर कष्ट करून स्वतः पुरतं एक घरटं बनवतात..
   ज्याच्या ओढीने संध्याकाळी परतताना माणसाचा महासागर ओलांडतात..."

   ही खरतर माझी पण आवडती ओळ आहे.....
   तुझ्या appreciation बद्दल खरच आभार...

   हटवा