रविवार, २२ एप्रिल, २०१२

फोटो


पूर्वीच्या काळी, घरात, शाळा-कॉलेजात असताना, कधी कधी एखादाच फोटो निघायचा..
पण आजकालच्या १०० डिजिटल फोटोपेक्षा मनाच्या १०० पटीने जवळ असायचा...

कधी वह्यांच्या पानात.. कधी अडगळीच्या bagमध्ये ...
तर कधी भिंतींवर मस्त फ्रेम करून टांगला जायचा..
कुणाचा बारशाचा, कुणाच्या लग्नाचा, वा सोडून गेलेल्या माणसाच्या आठवणींचा ठेवा असायचा..
पण आजकालच्या १०० डिजिटल फोटोपेक्षा मनाच्या १०० पटीने जवळ असायचा...

कधी सगळ्यांना जमवून आणि मोठ्या कष्टाने कॅमेरा मिळवून काढायचा
तर कधी उत्साहाने ओढत नेऊन स्टुडीओत जाऊन काढला जायचा..
प्रिंट व्हायला २ दिवस घेऊन उत्सुकता शिगेला न्यायाचा..
कुणाचे मिटले डोळे.. कुणाची फिरली मान दाखवून जाम-जाम हसवायचा..
पण आजकालच्या १०० डिजिटल फोटो ऐवजी मनाच्या १०० पटीने जवळ असायचा..

black -n -white फोटो ही तितकाच रंगीत वाटायचा..
पुढे मागे कधी काळी सापडल्यास त्याला आठवणींचा मुलामा चढायचा..
लहानपणीचा आवडता शर्ट / आवडता फ्रॉक.. अजाणतेपणी अंगावर चढायचा..
जितका जुना फोटो तितका मुरलेल्या लोणच्यासारखा गोड-गोड लागायचा...
पण आजकालच्या १०० डिजिटल फोटोपेक्षा मनाच्या १०० पटीने जवळ असायचा...

--विनायक कांबळे..

३ टिप्पण्या: