बुधवार, १८ जानेवारी, २०१२

एकांत...
काय अजब गोष्ट असते नाही!!!... "एकांत..."

आजूबाजूला कुणीही नसताना मनाला सलते ती खंत... म्हणजे एकांत...
माणसाच्या गर्दीत असूनही कधी असतं मन उदास उदास शांत.. म्हणजे एकांत...
खरंच किती अजब गोष्ट असते हा एकांत...!!!

कधी जीव नकोसा करणारा, जसा एखादा रोग संसर्ग असतो एकांत..
तर कधी हवा हवासा वाटणारा, शांत, सुंदर निसर्ग असतो एकांत...

कधी वर्दळीत, गडबडीत सहज मनात दाटून येतो तो एकांत..
तर कधी एखाद्या हळुवार क्षणी दोन जीवांमध्ये वाटून घेतो तो एकांत..

आनंद, दु:ख, कैफ, विरह..असंख्य भावनांचा असतो धनी एकांत....
कळत - नकळत, कधी सहज - उगीच जपला जातो मनी एकांत...

प्रत्येकाचा हक्काचा सोबती, हळुवारपणे तुटलेली मनं जोडतो तो एकांत... 
सगळी नाती सोडून गेली तरी, कधीही न एकटं सोडतो तो एकांत...

२ टिप्पण्या: