गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

गुरु परमात्मा परेषु....

शिक्षकी पेशा हे व्रत मानून त्याचं आजन्म पालन करत आलेले लोक हल्ली अभावानेच दिसतात.
मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला असे काही शिक्षक लाभले आणि आज माझ्यात जी काही स्वत्वाची जाणीव आहे, ती त्यांनीच करून दिलेली...
पुस्तकातल्या धड्यांच्या पलीकडे जाऊन, आयुष्य जगताना जी काही तयारी असावी लागते ते धडेही दिलेत. म्हणूनच कदाचित आज माझे निर्णय मी स्वत: घेऊ शकतो, इतका आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. पुस्तकी ज्ञान शिकवण्या व्यतिरिक्त एक "गुरु" म्हणून शिष्याला जीवनात योग्य मार्ग दाखवणे आणि त्याच्या गुण-दोषाची त्याला जाणीव करून देणे हे ही आदर्श गुरूच्या कर्तव्याचा भाग असतो. पण त्याची जाणीव किती जणांना असते?? आणि खरंच किती जण याच पालन करतात. आणि ती आस्था जपून ठेवतात शिक्षणाप्रती, विद्यार्थ्याप्रती??.
पण त्याचसोबत हल्ली आदर्श शिष्य हाही तितकाच दुर्मिळ. मित्रत्वाच्या नात्याने ज्ञानाचे डोस पाजणारे शिक्षक त्यांना जास्त जवळचा वाटतो. पण तेच गुरूच्या हक्कानी त्यांनी दमात घेऊन सांगितलं तर मात्र त्यांचा नसलेला स्वाभिमान जागा होतो. आणि तेच शिक्षक कुणा "हिटलर"पेक्षा वेगळे दिसत नाहीत.
आज पु. ल. देशपांडेंची "चितळे मास्तर" ही कथा ऐकताना खूप अस्वस्थ व्हायला झालं.. का कुणास ठाउक?
आजवर माझ्या आयुष्यात आलेले सगळे शिक्षक सर्र करून नजरेसमोरून गेले. प्रत्येक जण आपापल्या जागी अद्वितीय.. कुणाच्या प्रेमळ स्वभावाचा लळा, कुणाबद्दल आदर, प्रेम, कुणाच्या मारकुटेपणाची चीड, कुणाचा संतापी स्वभाव, कुणाचा लाघवी आणि सहज बोलणं... पण गमतीचा भाग असा की ती चीड, तो राग, शाळेच्या दिवसांसोबतच निघून गेलेला... पण ते प्रेम आणि तो लोभ अजून मनात कुठेतरी ठाण मांडून आहे..
शाळेतल्या शिक्षकांची गोष्ट थोडी वेगळी असते.. एक तर त्या वयात एखादा शिक्षक आवडणं म्हणजे त्या शिक्षकाचं "अहोभाग्यच"!! कारण त्या वयात एकूणच शाळेबद्दल असं किती लोकांचं मत चांगलं असतं? मग शिक्षकाची ती काय त-हा?? जेलच्या जेलर पेक्षा वेगळी प्रतिमा नसते आपल्या मनात..(काही अपवाद वगळता..) पण पुढे मोठं झाल्यावर कुठेतरी अचानक तेच शिक्षक भेटतात.. आपण त्यांना लक्षात असलो तर (त्यासाठी एकतर अतिहुशार असाव किवां महाद्वाड.. मधल्या गुणाच्या लोकांच्या लक्षात राहण्याची शक्यता कमीच..) आपली प्रेमाने चौकशी करतात.. कुठेतरी नक्कीच मनात वाटून जातं... आपण विचार करत होते तितके काही हे वाईट नाहीत.. आणि त्यांच्या त्या स्वभावाने झालाच असेल तर आपला फायदाच झालाय...नुकसान काहीच नाही...!!!
---विनायक कांबळे.

३ टिप्पण्या:

  1. Nice....Kahi varshanni jar majhya ekha jari vidyarthyala majhyabaddal asa kahi vatal tar tyapeksha mothi gosht nahi....hya professionbaddal aadhi mala vataych ki kahihi jhala tari shikshakane vidyarthyacha mitra banun rahila pahije...but I think barechda vidyarthyanna nusta god bolnara shishak ruchto..and as you said hya mitrane chuk dakhavli tar tyanna to khapat nahi....and one thing I can say for sure...nailajane hitlercha mukhavta kadhi kadhi chadhvava lagto....aso...

    उत्तर द्याहटवा
  2. nice. mala ankhin ek comment karavishi vattiye ti page chya ujwikade disnarya 'ashadhasya pratham diwse' baddal, pan tithe comment karaychi soy nahiye mhanun ithe kartoy. ".(पुढचं येत नाही...)" he lol ahe. ani ".पण त्या पावसाची ""सर" नाही त्याला..." he lai awadla aplyala

    उत्तर द्याहटवा