सोमवार, ९ जानेवारी, २०१२

नाती

काही नाती असतात माणसा-माणसातली,
काही असतात नजरे-नजरेतली;
तर काही असतात मना-मनातली,

त्यांना गरज नसते बोलण्याचीच ,
त्यांना अट नसते भेटण्याची,
कायम असतात ती अवती-भवती ,
प्रेरणा देतात जगण्याची.

दूर असो जवळ असो,
ओळख असो अथवा नसो,
मनात असतात मनातच राहतात
वस्ती करून कायमची.......
--विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा