मंगळवार, ४ मे, २०१०

कसाब

कसाब बद्दल वाचलं की चीड येते त्याची, आणि कीव येते भारत सरकार आणि त्यांच्या न्याय व्यवस्थेची .

ज्या माणसाने सहज बोटाने मुंगी मारावी इतक्या लीलया माणसा मारली. त्याला आपण वर्ष भर जिवंत ठेवला, त्याचा जेल मधला खाण्या पिण्याचा खर्च त्याच माणसाच्या खिशातून दिलेल्या करातून झालं ज्याचे भाऊ/बहिण/ आई/वडील/नवरा/ बायको/मुले किवा मित्र/मैत्रीण किवा माणूस म्हणून सहज तोंड ओळख असलेल्या निर्दोष माणसाना याच कसाब ने निर्घृणपणे मारलं. त्यात त्याचा माज इतका की तो स्वताला नाबलीग किवा धर्मांध म्हणवून घेतो, आणि माफीची अपेक्षा करतो?

वास्तविक त्याला त्याच रात्री (ज्या दिवशी तो पकडला गेला ) भर चौकात बांधून गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण करायला हवी होती. आणि त्या प्रत्येक माणसाला त्यांच्या प्रेतावर थुंकायची संधी द्यायला पाहिजे होती. पण तो अजूनही जिवंत आहे आणि आपला सरकार आपल्या पैशातून त्याला पोसतेय. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे!!!!!!

ज्या लोकांनी आपल्या आप्त नातेवाईकाला गमावलंय अशा लोकांना कोर्टात त्या हैवानासमोर उभं करून घडलेल्या गोष्टीचा पाढा पुन्हा वाचयला लावणे ही खरंच वाईट गोष्ट आहे. CST स्टेशनवर बसल्या जागी पाठीत गोळी जाऊन मेलेली मुलगी काय? किवां पायाला गोळी लागून अधू झालेल्या मुलीची पुढे औषधाच्या reaction मुले होणारी अवस्था सांगताना त्या आई / वडिलाची काय अवस्था होत असेल हे तेच जाणो आणि ईश्वर.
हा राक्षस आणखी किती दिवस पोसला जाणार आहे माहित नाही. त्याला या कोर्टात कदाचित फाशीची शिक्षा होईल ही. पण पुढे काय?
ती केस आणखी वरच्या कोर्टात जाईल. तिथे पुन्हा तेच. अफझल गुरूचा काय झालं? त्याला फाशी झाली का?

कसाब गुन्हेगार आहे, हे सगळ्या जगणे बघीतलं तरीही त्याच्यावर इतका खल करत बसणं कुठल्याही विवेकी बुद्धीला पटण्यासारखा नाही. या दहशतवाद्यांनी जिहादच्या नावाखाली सामान्य माणसाना किड्या मुंगी सारखं मारावं आणि आपण मात्र मानवतावाद आणि उदारमतवाद सारख्या पोकळ विचारांना कवटाळून अशी बांडगुळ पोसत रहावं?

गुन्हेगाराला शिक्षा होवो न होवो पण ह्या दिरंगाईने भारतीय न्याय व्यवस्थेची सामान्य माणसाच्या नजरेत मात्र अवहेलनाच होते.


--
विनायक भा. कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा